Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायू गळती.

नागरिकांमध्ये घबराट...!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 29, ऑगस्ट :- मुंबईत काही विभागांमध्ये महानगर गॅसच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे नागरिकांना घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा केला जातो. मुंबईतील परळ सारख्या गजबजलेल्या परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईन मधून गॅस गळती सुरू झाली, आणि जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत. याठिकाणी काही अंतरावरच पेट्रोल पंप असून मोठी दुर्घटना होऊन जिवीत हानी होऊ नये म्हणून आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला आहे. तसेच याठिकाणचा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले असून आग विझविण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.
महानगर गॅसचा निष्काळजीपणा यासर्व घटनेला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून आग विझविण्याचा प्रयत्न करत असून बराच वेळ होऊनही महानगर गॅसचा कुणीही अधिकारी अथवा कर्मचारी याठिकाणी दाखल झालेला नाही.दरम्यान अग्निशमन दलाने फोमचा टँकर आणला असून पाण्याने आग न विझल्यास फोमचा वापर करून आग विझविण्याचा प्रयास करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा घेतला बळी..!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिंदे गट दसरा मेळावा हायजॅक करणार?

Comments are closed.