Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्जुन रामपालच्या खास मित्राला एनसीबीकडून अटक. अर्जुन रामपालला आज चौकशीला हजर राहावे लागणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, 13 नोव्हेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यु प्रकरणाच्या चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्स, अंमली पदार्थ कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल यांची लवकरच चौकशी करणार आहे. पण, त्याआधी त्याच्या मित्राला एनसीबीने  अटक केली आहे.

आज सकाळी एनसीबीने अभिनेता अर्जुनचा जवळचा मित्र पॉल ग्रियाड याला अटक केली आहे. एनसीबीने पॉलची गुरुवारी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक केली आहे. त्यांची आणखी चौकशी केली जाणार आहे. पॉल हा एक ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट आणि मुंबई येथे राहणारा व्यापारी आहे. पॉल हा अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे. अर्जुनच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अ‍ॅगिसिलास डीमेट्रिएड्स याच्याशी पॉलचा व्यावसायिक व्यवहार होता. एनसीबीने दावा केला आहे की, पॉल अ‍ॅजिसिलोसकडून बंदी असलेली औषधं खरेदी करीत होता. या प्रकरणात अटक करण्यात येणारा पॉल हा दुसरा परदेशी नागरिक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अगोदर गुरुवारी एनसीबीने  अर्जुन रामपालला समन्स पाठवला होता. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी त्याला हजर राहावे लागणार आहे.  काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील चौकशी केली. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, Gabriella गुरुवारी देखील एनसीबीसमोर हजर झाली होती. बुधवारी गॅब्रिएलाची एकूण 6 तास चौकशी झाली होती.

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल यांच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं NDPS कायद्याअंतर्गत येतात. याप्रकरणी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची चौकशी झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.