Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उर्जामंत्र्याच आश्वासन फोल,दिवाळी आधी वीज बिल सवलत नाहीच.

लोकस्पर्श न्यूज

मुंबई : १३ नोव्हें.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील दोन नोव्हेंबर रोजी दिवाळी आधी वीज बिल सवलती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे संकेत दिले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असता. आज दिवाळीचा पहिला दिवस, या आठवड्यात कॅबिनेट बैठकही होत नाही, त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रस्ताव ही आलेला नाही. म्हणून दिवाळीत देखील वीज बिलांबाबत दिलासा नाही असंच चित्र आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना काळात आलेल्या वीजबिलांबाबत सामान्य नागरिकांना अजूनही दिलासा नाही. दिवाळीआधी या प्रकरणी दिलासा देऊ असं आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दोन नोव्हेंबर रोजी दिलं होतं, पण याबाबत अजूनही शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या आठवड्यात कोणतीही मंत्रिमडळ बैठक नसल्यामुळे वाढीव वीजबिलांबाबत ग्राहकांना दिलासा मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात वीज बिल ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं आली होती. यावरून मनसेने आंदोलन देखील केलं होतं. राज्य सरकारने वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊन वीजबिलांबाबत काय सवलत देता येईल, याची चाचपणी देखील केली होती. पण राज्यावरील आर्थिक संकट पाहता ही सवलत देता येईल का हाच प्रश्न होताच. त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रश्न प्रलंबित राहिला. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या प्रश्नाबाबत
राज्यपाल यांना भेटून आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होतं. कर्जाचे हफ्ते त्यात भरघोस आलेली वीज बिलं यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष होता. पण या प्रश्नी नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आता मावळत चालली आहे का? हाच प्रश्न आहे.

Comments are closed.