महाराष्ट्रातील तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात गृह विभागाकडून सध्या बदल्यांचा धडाका सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी गृह विभागाने 17 मे रोजी 27 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला होता. त्यानंतर लगेच पाच दिवसांनी आज पुन्हा एकदा तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषनेनंतर राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. विशेष म्हणजे शासनाकडून काल IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आज IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षकांसह रायगड, कोल्हापूर, अकोला, नागपूर, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Plus
मुंबई
महाराष्ट्र
न्यूज
आयपीएल
अर्थ
सिनेमा
लाइफस्टाइल
भविष्य
Viral
देश
क्रीडा
थोडक्यात
विदेश
निवडणूक
कृषी
व्हिडिओ
Marathi Newsmaharashtramumbai newsMaharashtra Ips Transfer Home Department Issues 21 Officers Order
IPS Officers Transfers : महाराष्ट्रातील तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 13 जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधीक्षक
Maharashtra IPS Officers Transfers : राज्यात गृह विभागाने मोठे फेरबदल केले असून, २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. शासनाने काल आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Follow
Authored by: चेतन पाटील
Updated: 22 May 2025, 9:42 pm|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : महाराष्ट्रात गृह विभागाकडून सध्या बदल्यांचा धडाका सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी गृह विभागाने 17 मे रोजी 27 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला होता. त्यानंतर लगेच पाच दिवसांनी आज पुन्हा एकदा तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषनेनंतर राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. विशेष म्हणजे शासनाकडून काल IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आज IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
- गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक यतिन देशमुख यांची पालघर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- नागपूर शहर पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुंबईचे सहायक पोलीस महासंचालक राजातिलक रोशन यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्य राखीव पोलीस बल, पुणे येथील समादेशक आंचल दलाल यांची रायगड पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- नांदेड नागरी सुरक्षाचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- अकोलाचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 4 नागपूरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे मंगेश शिंदे यांची नागपूरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
- ठाण्याचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- बुलढाणाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची राज्य राखील पोलीस दल अमरावती येथे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- नागपूर गुन्हे अन्वेषणचे निलेश तांबे यांची बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आगे.
- लातूर पोलीस अधीक्षक सोमया मुंडे यांची संभाजीनगर परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पुणे दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक जयंत मीणा यांची लातूर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- संभाजीनगरचे उपायुक्त नितीन बगाटे यांची रत्नागिरी पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments are closed.