Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कल्याणमध्ये एएसजी डोळ्यांचे रुग्णालयाचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; रुग्णांना मिळणार 1 महिना मोफत ओपीडी सेवा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

कल्याण, 13 ऑक्टोंबर : कल्याण- नेत्र उपचारासाठी एएसजी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. देशातील ख्यातनाम नेत्रउपचाराची साखळी एएसजी आपल्या विस्तार धोरणाअंतर्गत कल्याण येथे दाखल झाले आहे. एएसजी समूहाचे रुग्णालय देशातील 83 शहरात 160 हुन अधिक शाखा कार्यरत आहेत. दरम्यान, सातव्या शाखेचे उद्घाटन खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. डोळ्यासंदर्भातील अत्याधुनिक यंत्रनेचा वापर करून सुविधा देणार सुसज्ज हॉस्पिटल आहे. कल्याण शहरात अशा हॉस्पिटलची आवश्यकता होती. सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम असल्याने रुग्णांना उत्तम उपचार याठिकाणी केले जातील. असे उदघाटन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. सदर रुग्णालय मोतीबिंदू, तेसीक विट्रो रेटिना सर्जरी, आक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा कोर्निया, तिरळेपणा, ऑप्थल्मोलॉजी यावर उपचार केले जातील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एएसजी रुग्णालयाकडून जनजागृती आरोग्य शिबीर

नेत्ररोगाच्या श्रेणीवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व जटील शास्तक्रिया, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. एएसजी डोळ्यांचे रुग्णालय वेळोवेळी मोफत जनजागृती आरोग्य शिबीर आयोजित करणार आहेत. सध्या सर्वच वयोगटातील लोकांचे स्क्रीनटाईमस अधिक असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याकरिता सातत्याने शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटना याठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वर्षातून प्रत्येकाने किमान 2 वेळा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एएसजी समूहाचा प्रवास
सन 2005 मध्ये डॉक्टर अरुण सिंघवी आणि डॉक्टर शिल्पी गांग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजी आय समूहाची महुर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होत गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एएसजी समूहाची स्थापना करण्यात आली. एएसजी समूहाचे रुग्णालय संपूर्ण भारतात कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयांची शाखा पूर्व आफ्रिका खंडातील युगांडा मधील कपाला येथे कार्यरत असून दुसरी शाखा नेपाळ मधील काठमांडू येथे आहे. मिळालेले मानाचे पुरस्कार एएसजी आय समूहाला आजवर अचिव्हरर्स 2009, उत्कृष्ट सेवेसाठी वेलनेस 2010, राजीव गांधी गोडमेडल 2014 आदी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. एएसजी नेत्र रुग्णालयात चार अनुभवी आणि वरिष्ठ डॉक्टरांची टिम काम कार्यरत असणार आहे ज्यामध्ये डॉक्टर नितेश साळुंखे, डॉक्टर रोहित मेंडके, डॉक्टर मानस देशमुख आणि डॉक्टर हरीष पाठक यांचा समावेश आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.