Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मित्राला वाचविले अन ..डॉ. नैतामच स्वतः धबधब्यात बुडाले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी दी, १५ ऑक्टो : तेलंगणातील सिपेली येथे असलेल्या निसर्ग पर्यटनाचा धबधब्यात – आंघोळीसाठी उतरलेल्या मित्राचा पाय घसरून धबधब्यात पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा तेलंगणातील गुंडेमनजीच्या धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार १५ ऑक्टोबर रोजी घडली असून मृत्यू झालेल्या नाव डॉ. किशोर नैताम (४६) असे नांव आहे.
रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने मृतक डॉक्टर व अन्य डॉक्टरांचे परिवार आलापल्ली येथून १३ किमी अंतरावरील तेलंगणातील गुडेंमपासून जवळच असलेल्या नैसर्गिक धबधब्याचा आनंद लूठण्यासाठी गेले होते. धबधब्यातील पाणी पाहून पाण्यात उतरण्याचा मोह आवरला आणि या ठिकाणी सोबत असलेल्या मित्राचा पाय पाण्यात घसरला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी डॉ. किशोर नैताम पाण्यात उरतले. आणि मित्राला जिवदान दिल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.

मृतक डॉ. किशोर नैताम हे अल्लापली येथील रहिवासी असून पत्नीही डॉक्टर असल्याने नवीन दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम ही सुरू होते. अशातच डॉक्टरचा मृत्यू झाल्याने मृत डॉक्टर ला वैद्यकिय सेवा करण्याची संधी ही मिळाली नाही. मात्र डॉक्टर पत्नी यांची सेवा अविरत सुरू आहे. अल्लापल्ली शहरात घटना माहिती होताच वाऱ्यासारखी बातमी पसरली.अत्यंत साधा डॉक्टर कुठेही रोग्यांना उपचारा संदर्भात तत्पर,आणि मंन मिळावू स्वभाचे असल्याने चांगलेच परिचित होते .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृत डॉक्टर त्यांचे प्रेत अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवचिच्छेदन करून घरी आणले असून आज दीं,१६ ऑक्टो ला त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार आल्लापल्ली येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे.

डॉक्टर यांच्या पश्चात आई,वडील, दोन मुलांसह पत्नी, दोन भाऊ व बहीण आहे.
डॉक्टर किशोर यांचे मित्राला वाचवून स्वतःच अचानक बुडून गेल्याने कुटुंब, मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.