Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यतच उभारा, अन्यथा प्रकल्प उठवा

Get real time updates directly on you device, subscribe now.

खासदार अशोक नेते यांचा इशारा

गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर: आज दिनांक एटापल्ली येथे पत्रकार परिषद पार पडली या वेळेस सूरजगड प्रकल्पा बद्दल बोलताना स्थानिकांना पूर्णतः प्राधान्य देण्यात यावे आणि अकुशल बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन कुशल बनवून त्यांनाच कामावर घ्यावे आणि प्रकल्प इथेच उभारण्यात यावा अन्यथा प्रकल्प उठवावा असा ईशारा देत वेळेप्रसंगी आंदोलन करू आणि प्रकल्प बंद पाडू असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी पूर्वविदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रमेशजी बारसागडे, जिल्हा सचिव संदीप कोरेत, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवर, प्रदेश युवा मोर्चा सदस्य स्वप्नील वरघंटे,तालुका अध्यक्ष बाबुराव गंपावार, महामंत्री प्रसाद पुल्लूरवार, जनार्धन नल्लावर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निखिल गादेवार, अशोक पुल्लूरवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संपत पैडाकुलवार आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.