Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलिस आणि नक्षल्यांत
उडाली चकमक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : भामरागड तालुक्यात असलेल्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात येत असलेल्या मडवेली जंगल परिसरात आज पोलीस जवान आणि नक्षल्यात चकमक उडाल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार ताडगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत असलेल्या मडवेली जंगल परिसरात सी-६० पोलिस जवानांचे पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पोलीस जवानांनी नक्षल्यांस जशास तसे चोख प्रतिउत्तर दिले. ही चकमक जवळपास एक तास सुरू होती. त्या चकमकीत काही नक्षल गंभीर जखमी झाल्याची शक्यता असून पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. त्यावेळी पोलिस जवानांनी सरचिंग ऑपेरेशन अधिक तीव्र केले असता जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचे दैनंदिन वापरात असलेले साहित्य व महत्वाचे धागेदोरे पोलिस जवानांच्या हाती लागले असल्याची सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या चकमकी संदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना विचारणा केली असता चकमक झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

सुरजागड लोह प्रकल्प आले रडारवर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सोमाजी सडमेक यांची हत्या झाल्यानंतर नक्षल्यांनी मागील जून महिन्यात सुरजागड परिसरात टाकलेल्या पत्रकात त्यांचे नाव होते. त्यानंतर पोलिसांनी सोमजी ला सूचना पत्र देऊन सावध केले होते. त्यात सुरजागड लोह प्रकल्पाला विरोध असल्याचे हत्या झाल्यानंतर स्पष्ट झाल्याने पुन्हा किती लोकांना निशाणा केले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याशिवाय सोमाजी सडमेक यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिट्टी आढळली आहे. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या  दलाल नेत्यांना हाकलून लावा असे टाकलेल्या चिट्टी मध्ये मराठीत लिहिले आहे हे विशेष.

हे देखील वाचा :

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या

Comments are closed.