Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोस्ट कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण..

आल्लापली पोस्ट कार्यालयाचा भार एकाच पोस्ट मास्टरवर. सामान्य नागरिकांना वेळखावु धोरणामुळे बसतो आर्थिक फटका...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. ४ डिसेंबर : आलापल्ली उप डाकघर (Allapalli Sub Post Office) येथे अनेकपद रिक्त असल्याने येथील संपूर्ण कामाचा भार केवळ पोस्ट मास्टरवर आला आहे. यामुळे आलापल्ली डाकघरातील कामे पाहिजे त्या वेळेत लवकर होत नसल्याने ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.

आलापल्ली उप डाकघरात (Allapalli Sub Post Office) पैसे जमा करणे, पैसे वितरीत करणे, आर्डी एजंट कडून लॉट घेणे, स्पीडपोस्ट करणे व इतरत्र सर्वच कामे पोस्ट मास्टरच करत असल्यामुळे ग्राहकांना अर्धा तास एक तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या डाकघरात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आल्लापल्ली शहर मोठे असल्याने येथील डाकघरात येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे स्पीड पोस्ट, रजिट्री, पार्सल पोस्ट द्वारे पाठविण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते पण या सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे करण्याकरिता या डाकघरात कॉम्प्युटर ऑपरेटरच (computer operator) नाही. त्यामुळे ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

याबाबत पोस्टमास्टर माटे यांना विचारणा केली असता कॉम्प्युटर ऑपरेटर नसल्याने ही समस्या जाणवत असल्याचे सांगितले त्यामुळे लवकरात लवकर कॉम्प्युटर ऑपरेटर व इतर रिक्त पदांची नियुक्ती करावी.  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अशोक प्रभाकर आईंचवार यांनी आपल्या पत्रकातून केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

‘लोकस्पर्श’ न्युज चा दणका… आदिवासी महिलांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून रस्ता खोदल्या प्रकरणी अखेर आरोपींविरोधात गुन्हा दाखल…

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु, शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड

मिठाई खाताय… तर सावधान, केमिकलने बनवलेला लाखो रुपयांचा बनावट खवा जप्त…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.