Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शालेय विद्यार्थ्यांनी रॅली मार्फत मतदारांमध्ये मतदानविषयक केली जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

प्रतिनिधी – सचिन कांबळे.

नगरपंचायती निवडणूकीचे वारे सध्या वाहत असून मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे तसेच १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महसूल विभाग, कोरपना यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी कोरपना शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढली. या रॅली मार्फत विद्यार्थ्यांनी नागरिकांंमध्ये मतदानाविषयक जनजागृती करून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरपना, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महसूल विभाग, कोरपना यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी कोरपना शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढून नागरिकामध्ये मतदानाविषयी जनजागृती केली.

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. असे आवाहन या रॅली मार्फत करण्यात आले.

सदर रॅलीमध्ये मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, कोरपना साजाचे तलाठी प्रकाश कमलवार, वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य खडसे व विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांचा समावेश होता.

हे देखील वाचा :

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान

भारतीय संविधान दिनानिमित्त अहेरीत भारतीय संविधान-साहित्य सम्मेलनाचे आयोजन

राज्यभरात एक डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु, शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड

 

Comments are closed.