Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय संविधान दिनानिमित्त अहेरीत भारतीय संविधान-साहित्य सम्मेलनाचे आयोजन

माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात संविधानावर आधारित प्रबोधन व होणार चर्चासत्रे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २५ नोव्हेंबर: संविधान फाउंडेशन नागपूर व आरक्षण हक्क कृती समिती, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान- साहित्य सम्मेलन आयोजन समिती तालुका अहेरीच्या वतीने संविधानीक मूल्यांचा जागर करण्यासाठी इंडियन फंक्शन हॉल येथे २८ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान-साहित्य सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे शुभारंभ होणार असून यासाठी सेवा निवृत्त सनदी अधिकारी तथा संविधानाचे गाढे अभ्यासक इ. झेड. खोब्रागडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

उदघाटक अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंकित (भा. प्र.से.) करणार असून प्रमुख अतिथी म्हणून आलापल्ली उपविभागीय वन संरक्षक राहुल सिंह टोलिया (भा.व.से), भामरागडचे उपवनसंरक्षक आशिष पांडे(भा. व.से.), गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनिंद्र कुत्तीरकर, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, संविधान फाउंडेशन नागपूरचे दीपक निरंजन, प्राचार्य डॉ.महेंद्रकुमार मेश्राम,  रेखा खोब्रागडे, साहित्यिक कुसुमताई आलाम उपस्थित राहणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुसऱ्या सत्रात संविधानावर आधारित विविध विषयांवर विस्तृत होणार भारतीय संविधानाचे प्रबोधन.

दुसऱ्या सत्रात संविधानावर आधारित दुपारी १२.३० ते ३.१५ वा. पर्यंत दुसऱ्या सत्रात संविधानावर आधारित विविध विषयांवर संविधान प्रबोधन असून अध्यक्षस्थानी बबलू भैय्या हकीम असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. सुरेश डोहाणे गडचिरोली, ऍड. लालसू नागोटी, भामरागड, डॉ. महेंद्र कुमार मेश्राम, नागपूर, ऍड. उदयप्रकाश गलबले, अहेरी हे मार्गदर्शन करणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समारोपीय सत्रात सायंकाळी ५.०० वाजता अहेरीचे  तहसीलदार ओंकार ओतारी, एसडिपीओ अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, डॉ.कन्ना मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, सेवानिवृत्त तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे, अन्न पुरवठा अधिकारी शिल्पा दरेकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

विशेष व उल्लेखनीय म्हणजे मनोरंजन प्रबोधनातून स्नेहा चालूरकर व त्यांचा संच एकपात्री प्रयोग सादरीकरण करणार असून खुली चर्चा सत्रात थेट विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देण्यात येणार आहेत.

संविधानावर आधारित वेगवेगळ्या पैल्लूवर परिसंवाद, चर्चासत्र असे एकंदरीत भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान साहित्य सम्मेलन समितीचे मुख्य प्रवर्तक गौतम मेश्राम यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

हे देखील वाचा :

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम

गडचिरोली जिल्हयात दि.२७ नोव्हेंबर पासून १५ दिवस जमावबंदी

Comments are closed.