Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाचव्या फेरी अखेरीस वांजरीना १४,४०७ मतांनी आघाडी-नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

Get real time updates directly on you device, subscribe now.


-विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे  द्वितीय क्रमांकाच्या मतमोजणीला प्रारंभ-विजयासाठी ६० हजार ७४७ मते मिळवणे आवश्यक

नागपूर, दि.४ डिसेंबर : नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार  अभिजित वंजारी यांनी १४,४०७ मतांची आघाडी घेतली होती. परंतु विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात करण्यात आली आहे. पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजित वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१,  राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली. पाचव्या फेरीनंतर एकाही उमेदवाराने मतदानाचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे दुस-या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.