अहेरी तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव करा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांची तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अहेरी, दि. ३ मार्च: अहेरी तालुक्यातील रखडलेले रेती घाटाचे लिलाव तात्काळ करून घरकूल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून घ्या अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी तहसीलदार अहेरी यांना दिले आहे.
अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना लवकरच प्रारंभ आदेश देण्यात येणार असुन घरकुल बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. परंतु मागील दिड ते दोन वर्षापासून प्राणहीता नदी घाटाचे शासनातर्फे लिलाव करण्यात आलेले नसल्याने अहेरीकरांना बाहेरून रेती आणावी लागत आहे. बाहेर गावावरून महाग रेती विकत घेणे गरीब लाभार्थ्यांना परवडणार नाही करिता घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दरात नजीकच्या प्राणहीता नदी घाटावरून रेती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी तहसीलदार अहेरी मार्फ़त जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
Comments are closed.