Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

औरंगाबाद, दि. २२ नोव्हेंबर: औरंगाबादमध्ये अंगावर काटा आणणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीने आपला वापर केल्याचा आरोप करतत एका उच्चशिक्षित रुणाने स्वतःसह प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असून,पूजा असे पीडित तरुणीचे नाव आहे. या घटनेत गजानन 85 टक्के तर पूजा 50 टक्के भाजली आहे, दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

औरंगाबादच्या शासकीय विज्ञान संस्थेमध्ये पी.एचडी करणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून घेत, प्रेयसीला मिठी मारली. गजानन आणि पूजा दोघेही औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण घेत होते. पूजा ही झूलॉजी प्रोजेक्टची तयारी करण्यासाठी फॉरेन्सिक विभागात प्रोजेक्टवर काम करत होती. त्यावेळी गजानन तेथे पेट्रोलच्या दोन बाटल्या घेऊन आला आणि त्याने दरवाजा लावला. कुणाला काही कळायच्या आतच त्याने पेट्रोलची एक बाटली स्वतःच्या अंगावर टाकून घेतली आणि तात्काळ दुसरी बाटली पूजाच्या अंगावर ओतली. त्यावेळी तेथे उपस्थित प्राचार्यांना शंका येताच त्यांनी पळायला सांगितल. मात्र तोपर्यंत गजाननने पुजला मिठी मारत स्वतःकडील लाईटरने पेटवून घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात दोघेही गंभीर भाजले आहेत. गजानन ८५% तर पूजा ५०% टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती बेगमपुरा पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली आहे.

दोघांनाही तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रेयसी ने आपल्याला वापरून घेतल्याचा तरुणाचा आरोप

गजानन आणि पूजा या दोघांचा औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागात परिचय झाला सुरुवातीला मैत्री आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. गजानन पूजाला लग्न करायचं म्हणत होता परंतु पूजा लग्नाचा विषय टाळत होती अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पूजाने माझा केवळ वापर केला

असा आरोप करत गजानन हे टोकाचे पाऊल उचलण्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पूजाने काही दिवसांपूर्वीग जानन आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांत दिली असल्याची माहिती देखील समोर आहे.

हे देखील वाचा :

हृदयद्रावक घटना: गरोदर पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीनेही जीवन संपविले…

उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.