नागेपल्लीत गृह कर व कोरोना बाबत ऑटो द्वारा लाऊडस्पीकर वर जनजागृती
अहेरी, दि. ४ मार्च: नागेपल्ली ग्रामपंचायती मार्फत थकीत असलेल्या गृहकर भरण्यासाठी व कोरोना बाबत खबरदारी घेण्यासाठी आटोद्वारा लाऊडस्पीकर लावून नागेपल्ली गावातील पाचही वॉर्डातील नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे.
गावातील नागरीकांनी लवकरात लवकर थकीत असलेला गृहकर भरून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे. सोबतच जप्ती टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा फोफावत आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघताना मास्क घालावा व सॊबतच बाजारवाडीत गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स चे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई सामोरे जावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
Comments are closed.