Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बामणी प्रोटीन्स कंपनीतील रसायनाच्या टाकीत गुदमरून १ कामगाराचा मृत्यू ,पाच कामगार जखमी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर ३१-ऑक्टो  :- बल्लारपूर तालुक्यातील  बामणी प्रोटीन्स प्रा. ल. कंपनीमधील रसायनाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. तर अन्य पाच कामगार जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती अत्यव्यस्थ आहे. जखमींना उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले. ही घटना शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

विशाल वसंतराव मावलीकर असे मृत कामगाराचे नाव आहे. तर जखमीमध्ये शैलेश गावंडे, बंडू निवलकर, मनोज परशुराम मडावी, कपिल परशुराम मडावी, अविनाश वासुदेव चौधरी यांचा समावेश आहे. बल्लारपूर शहरालगत असलेल्या बामणी प्रोटिन्स या कंपनीत प्रोटीन्स पावडर तयार केला जातो. नेहमीप्रमाणे ‘टँक’ ची स्वच्छता करण्यासाठी सुरवातीला एक कामगार उतरला. तो लगेच बेशुद्ध पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी अन्य दोन कामगार खाली उतरले असता, तेही बेशुद्ध पडले. काही कालावधीने अन्य दोन कामगार टॅकमध्ये उतरले आणि त्यांनी त्या तीन कामगारांना बाहेर काढले. तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. तर दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक होती. अन्य दोन कामगारांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.लागलीच रूग्णवाहिकेला पाचारण करून कामगारांना चंद्रपुरला हलविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन कामगारांवर सामान्य रूग्णालयात तर अन्य दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने जमाव शात झाला. झालेली घटना दुःखद असून, मृतक आणि गंभीर व्यक्तीच्या आम्ही पाठीशी आहोत. कारखान्याच्या वतीने त्यांना परिपूर्ण मदत दिली जाईल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापक सतिश मिश्रा यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.