पॉवर ऑफ युथ फाउंडेशनकडून श्रमजीवी कोविड केअर सेंटरला बेड, धान्य आणि करमणूकीच्या साहित्याची भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
उसगाव/वसई दि. 28 मे : विधायक संसद व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या श्रमजीवी कोविड केअर सेंटरला ‘पॉवर ऑफ युथ फाउंडेशन’ कडून बेड, धान्य आणि करमणूकीच्या साहित्याची भेट देण्यात आले.
यावेळी कोविड सेंटरच्या माध्यमातून सुरु असलेली रुग्णसेवा पाहून व एकंदरीतच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या कार्याने सदर पदाधिकारी भारावून गेले. तर, विवेक पंडित यांनी “आपले कार्य अतिशय मोलाचे आहे” अशा शब्दात ‘पॉवर ऑफ युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
विनामूल्य सेवा देणाऱ्या श्रमजीवी कोविड केअर सेंटरला मदत करण्याच्या हेतूने माजी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील यांनी मुंबई स्थित पावर ऑफ युथ फाउंडेशनला वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत पावर ऑफ युथ फाऊंडेशनच्या वतीने श्रमजीवी संघटनेच्या उसगाव स्थित कोविड श्रमजीवी संघटनेच्या बाल कोविड सेंटर सेंटरला 15 बेड, धान्य आणि करमणूकीच्या साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
उसगावच्या विधायक संसद आवारात शुक्रवारी (ता.28) दुपारी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेके पंडित यांच्या उपस्थितीत साहित्य देण्यात आले. तसेच आमच्या मरिने आम्ही आणखी बेड आणि इतर साहित्य देणार असल्याचे करण सिंह प्रिन्स यांनी सांगितले.
यावेळी पावर ऑफ युथ फाउंडेशनचे संस्थापक करण सिंह प्रिन्स, बबिता सिंह वर्मा, प्रियंका बॅनर्जी, माजी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील, श्रमजीवी संघटनेचे पालघर तालुका अध्यक्ष दिनेश पवार, माजी सरपंच विकास पाटील, नितेश पाटील, दिनेश काटले, मनोज सातवी, महेश धांगडा आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड
Comments are closed.