Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मातृ वंदना योजनेंतर्गत गडचिरोलीत 24585 मातांना योजनेचा लाभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 11 डिसेंबर : केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यास पात्र  ठरलेल्या 24 हजार 585 (महिलांची) गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 23 हजार 73 मातांना लाभ मिळालेला आहे. सदर योजनेंतर्गत 13 कोटी 22 लाख 61 हजार एवढे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

       भारतातील असंख्य महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे गर्भवती (महिला) गरोदर व स्तनदा माता कुपोषित राहुन त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन परिणामी कधी कधी मृत्यू संभावतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर व स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणा-या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून राबविण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम असुन अशा ठिकाणी खरतरं मातांना याचा लाभ मिळत असल्याने मातांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन मातृत्व स्विकारतांना त्यांचा आनंद द्विगुणीत झालेला आहे. जिल्हात आतापर्यंत 23 हजार 73 मातांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुकानिहाय नोंदणी झालेल्या माता :- अहेरी -2435, आरमोरी-2351, भामरागड-575, चामोर्शी-3687, धानोरा-1868, एटापल्ली-1371, गडचिरोली-3589, कोरची-1289, कुरखेडा-2251, मुलचेरा-1427, सिरोंचा-1678, वडसा-2064, गडचिरोली जिल्हा 24585, अशी आहे.

तीन टप्यात दिली जाते मदत : मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसाचे आत नोंदणी केल्यास पहिला लाभ 1 हजार रुपये, शासकिय व खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुतीपूर्व किमान एकदा आरोग्य तपासणी-चाचणी केल्यास 2 हजार रुपये,बाळाचे  साडेतीन महिण्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केल्यास तिसरा लाभ 2 हजाररुपये असे एकुण 5 हजार रुपये इतका लाभ दिला जातो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी गडचिरोली जिल्हयात केली जात आहे. सर्व तालुके तसेच नगर परिषदां मध्ये योजनेव्दारे मदत केली जाते. जी प्रकरणे कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत त्यांचा निपटरा करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. नोंदणी केलेली एकही माता (महिला) लाभापासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष देण्यात येत आहे. गर्भवती व स्तनदा मातेला या योजनेव्दारे लाभ मिळून देण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.