Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजाराम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन.

पंं.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ६ डिसेंबर: अहेरी तालुक्यातील राजाराम येथील डॉ. आंबेडकर चौकात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेजवळ मेनबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर अहेरी पंचायत समितीचे सभापति श्री. भास्कर तलांडे, यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी पंचशिल ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अँड. श्री. हनमंतू आकुदर, मधुकर गोंगले, मनोज आकुदर, जयराम दुर्गे, गंगाराम गोंगले, साईनाथ दुर्गे, सुधाकर गोंगले,गोविंदा गोंगले,तिरुपती दुर्गे,विलास दुर्गे,उमाजी शेंगावकर,किशोर गोंगले,लिंबूना गोंगले, नेपाली दुर्गे तसेच गावांतील इतर नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.