धर्मराव कृषी विद्यालयात भीम जयंती
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 14 एप्रिल : स्थानिक धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्राचार्य अनिल भोंगळे यांच्या अध्यक्षीय कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.देशातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे राज्यघटनेचे शिल्पकार, महान संशोधक, युगपुरुष, महामानव, उच्चविद्या विभूषित , पत्रकार, समाजशास्त्रज्ञ, कायदे तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी, इतिहासकार, विज्ञानवादी, समता – बंधुता व सामाजिक न्यायाचे पुरस्करते, गोरगरीब कामगारांचे उद्धारक असल्याचे प्रतिपादन शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणातून केले.
यावेळी ग्रंथपाल हेमंत बोरकर यांनी बाबासाहेबांवर गीत सादर केले. मंचावर के के ठेंगरे, प्रा. श्याम बारसे, दिनेश ठीकरे, आतिश दोनतूलवार, मुकेश गोंगले, नीता बर्डे, मंगला भागवत, येसंबरे , गुडघ्याने, खोंडे ,जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते.
हे पण वाचा :-


Comments are closed.