Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथील धम्मभूमीत बाबासाहेबांना अभिवादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 14 एप्रिल :- धम्मदीक्षा भूमी विहार, बोधिसत बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ व यशोधरा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अहेरी व परिसरातील उपासक , उपासिका व समाज बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिवादन केले.

मंडळाचे अध्यक्ष किशोर शंभरकर, मलय्या दुर्गे, खुशाल डोंगरे, सुरेश अलोणे यांनी ध्वजारोहण व घटनाकारांना पुष्प अर्पण केले.
त्यानंतर यशोधरा महिला मंडळाच्या शीलाताई डोफे, चेतना चालूरकर , वनिता कन्नाके, नंदा दुर्गे यांनी विहारात बुद्ध वंदना, पंचशील व भीम स्तुतीचे वाचन सर्व उपासकांना केले. कार्यक्रमाला दुधे, रामटेके, गडपायले, ढवळे, झाडे, ओंडरे, खोब्रागडे, सुखदेवे व समाज बांधव उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.