Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर वन विभागाने महिलेला ठार करणाऱ्या टी-१३ वाघिणीलाकेले जेरबंद..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 25 ऑक्टोंबर : आरमोरी तालुक्यातील रामाळा येथे चार दिवसांपूर्वी महिलेला ठार करणाऱ्या टी-१३ या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला आज सकाळी यश आले आहे.
१९ आॅक्टोबरला आरमोरी शहरातील काळा गोटा परिसरात राहणारी ताराबाई धोडरे ही वृद्ध महिला रामाळा येथील शेतात धान कापत असताना वाघिणीने तिच्यावर हल्ला करून ठार केले होते.
त्यानंतरही त्या परिसरात वाघिणीचा वावर अढळून येत होता. ती हल्ला करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर वनविभागाने वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली होती.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्प शुटर अजय मराठे यांनी आज सकाळी पावणे आठ वाजता मुल्लूर चक येथील जंगलात वाघिणीला डार्ट करून कुठलीही इजा न करता तिला जेरबंद केले. वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक संदीप भारती, वनपरिक्षेत्राधिकारी पवनकुमार जोंग यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पाडण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.