Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथे भाजपा तर्फे सामान्य जनतेसाठी निशुल्क ऑक्सिजन काँसन्ट्रेटर उपलब्ध

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आ. डॉ. रामदास आंबटकर यांच्या सहकार्याने मिळालेल्या ३ मशीन्सचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २४ मे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अहेरी व परिसरातील कोरोना रुग्णांना निशुल्क ऑक्सिजन उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तर्फे २ तर ग्रामोत्थान परीषद, एकल अभियान नागपूर तर्फे १ असे एकूण ३ ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन अहेरी येथे देण्यात आले होते, आज त्या मशीन्सचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव यांच्या हस्ते अहेरी येथील एका कोरोना रुग्णांच्या नातेवाईकाला एक मशीन सुपुर्द करुन अधिकृत लोकार्पण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना संकटात सध्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे, त्यातच सद्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेकांचे ऑक्सिजन अभावी जीव जाण्याचे ही प्रकार घडले आहे, ह्याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीतुन भारतीय जनता पार्टी अहेरी तालुका तर्फे सामान्य जनतेसाठी ही ऑक्सिजन काँसन्ट्रेटर मशीन आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे, गरजुवंतानी ह्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ह्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री संतोष (पप्पू) मद्दीवार, मुकेश नामेवार, दिलीप पडगेलवार, रक्षित नरहरशेट्टीवार, सुजित कोडेलवार सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

म्यूकरमायकोसीसवर लवकर निदान झाल्यास उपचार शक्य

बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.