Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपाचे राम व रेखा यादव यांचा शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटाचा भाजपला दे धक्का

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 19 ऑक्टोबर :- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव व रेखा यादव या दाम्पत्याने शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी यादव दाम्पत्याने भाजपच्या आमदार मनीषा चैधरी यांच्यावर राजकीय कोंडी करत असल्याचा आरोप ही केला. मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या तोंडावर राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करणे हा भाजपासाठी मोठा धक्का समजला जात आहे. राम यादव यांच्या रूपाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाला आहे. त्यामुळे ठाण्याप्रमाणे मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रूजवण्यात एकनाथ शिंदे यांना मदत होईल.

राजकारणात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते. राजकारणात तर प्रत्येक पक्ष स्वतचे अस्तित्व टिकविण्याचे आणि ताकद वाढविण्याचे प्रयत्न करत असतो. राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे सरकार आहे. पण शिंदे गटाने भाजपच्या एका ताकदवान महामंत्री ला आपल्या पक्षात घेउन धक्का दिला आहे. भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मैत्रीच्या आणि एकीच्या कितीही आणाभाका घेतल्या जात असल्यातरी प्रत्यक्षात जमिनी वर परिस्थिती फार वेगळी असल्याचे उदाहरण सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी करणार्या भाजप नेत्यांना पक्ष नेतृत्वाने संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या फोडाफोडीचे रूपांतर संघर्षात होईल, ही शक्यता लक्षात घेउन भाजपाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये समट झाल्याचे दिसत होते. परंतु, शिंदे गटाने भाजपासोबतचा हा तह मोडला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – कंकडालवार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यार्थी सहकाराच्या भावनेतून ध्येय गाठावे – उमाजी गोवर्धन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.