Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यार्थी सहकाराच्या भावनेतून ध्येय गाठावे – उमाजी गोवर्धन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, 19, ऑक्टोबर :-  सध्याची बेरोजगारी विचारात घेता विद्याथ्र्यांनी सहकाराच्या भावनेतून अपने ध्येय गाठावे आणि स्वत:चे जीवन घडवावे असे प्रतिपादन शासकीय वनकर्मचारी सहकारी पतसंस्था आलापल्ली चे अध्यक्ष उमाजी गोवर्धन यांनी केले. आलापल्ली येथील राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय येथील वाणिज्य अभ्यास मंडळच्या वतीने सहकारी संस्थाचा अभ्यास करण्यासाठी वाणिज्य विद्याशाखेच विद्याथ्र्यांचा अभ्यास दौरा भेट प्रसंगी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यक्त केले.

यावेळी मंचावर संस्थे चे संस्थापकीय माजी सचिव तथा प्राचार्य डॉ. मारोती उध्दवराव टिपले, प्रा. दया मेश्राम, प्रा. अरूणा वाघाडे आदि उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेच्या वतीने 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थापकीय सचिव माजी डा. मारोती टिपले यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्याथ्र्यांना संस्थेचे व्यवस्थापन, कार्यपध्दती आणि संगणकीय लेखाप्रणाली व परंपरागत लेखाप्रणाली बाबतची सविस्तर माहिती प्रविण फुलझेले यांनी समजावून सांगितली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समारोपीय मार्गदर्शनात डॉ. टिपले यांनी बीकाॅम प्रथम वर्षला असलेले सहकारी संस्थांचे लेखे व प्रत्यक्ष कार्य यांची सांगड घालून संगणकीय लेखाप्रणाली समजून घेवून अभ्यासात भर घालावी असे प्रतिपादन केले. विद्याथ्र्यांनी सहकार व लेखा प्रणाली समजून घेतली. महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे अभार व्यक्त करण्यात आले. हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी वाणिज्य अभ्यास मंडळाचे समस्त पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चक्रीवादळ ऐन दिवाळीत फटका फोडणार ! हवामान खात्याचा अंदाज.

कॉफीटेबल बुक मधून उलगडले ‘समग्र रायगड’

Comments are closed.