Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्रीवादळ ऐन दिवाळीत फटाका फोडणार ! हवामान खात्याचा अंदाज.

सीतारंग वादळ आपले रंग उधळणार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 मुंबई 19 ऑक्टोबर :- दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीतरंग चक्रीवादळ असं या वादळाचं नाव असणार आहे. २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे.

चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली असून आत्तापर्यंत हे वादळ अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सीतारंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिवाळीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने जाहीर केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिल्ली-एनसीआर ते यूपी-बिहारपर्यंतच्या भागात मुसळधार पावसापासून दिलासा मिळाला आहे. उत्तर भारतातून दक्षिण-पश्चिम मान्सूनचे परतीचा प्रवास जवळपास पूर्ण झाला आहे, परंतु त्याचा प्रभाव दक्षिण आणि मध्य भारतात अजूनही दिसून येत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील पुणे-ठाण्यापासून ते कर्नाटक आणि केरळपर्यंत पावसाची संततधार सुरू आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचाही अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.