Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी पाड्यात शंभर रुपयाच्या रेशन किटचा काळाबाजार

दुकान मालकावर गुन्हा दाखल !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ठाणे, 23 ऑक्टोबर :-  प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे काही महाभाग असतात. असाच एक।महाभाग शहापूर तालुक्यात सापडला आहे .ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका आदिवासी रेशनधारक व्यक्तीला रेशनिंग दुकानदार चक्क १०० रुपयांची रेशन किट ३०० रुपयांना विकत असल्याची घटना उघडकीस आल्यावर संपूर्ण शहापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.

याबाबतची हकीगत अशी
शिंदे -फडणवीस सरकारने गाजावाजा करीत यंदाच्या दिवाळीत गोरगरीब शिधापत्रिका धारकांना १००  रुपयाची रेशन किटाची स्वस्त धान्य दुकानात उपब्लध करून दिली. मात्र मुख्ममंत्र्यांच्या जिल्हातच गोरगरीब  आदिवासी शिधापत्रिका धारकाकडून ३००  रूपयात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून. या रेशनदुकान मालकाविरोधात तक्रारी होताच, यांच्या विरोधात शहापूर  तहसीलदार निलिमा सुर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिंदे  सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी १०० रुपयाचे किट स्वस्त धान्य दुकानातून देण्याची घोषणा केल्यानंतर शासकीय धान्य गोदामात वस्तू स्वस्त धान्य दुकानांवर उशिरा का होई ना दिवाळीच्या रेशन किट पोहोचले.  यावर फोटो नसल्यामुळे ते वाटप काही काळ रखडले होते. या १०० रुपयांच्या किट मध्ये रवा, साखर, तेल, आदी वस्तू चा समावेश आहे.

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रेशनदुकानदार एकनाथ भला व इतर एक महिला, यांनी १०० रूपयाची धान्याची किट ३००  रूपयाला विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. हा प्रकार शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फुगाळा ,आगनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानात घडली आहे. या  दुकानाचा मालकाने १००  रूपयाची धान्याची किट ३०० रूपयाला विक्री करत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शहापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल  केली आहे. शहापूर तहसीलदार श्रीमती निलिमा सुर्यवंशी यांनी याची गंभीर दखल घेऊन दुकानदार एकनाथ भला याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान ठाणे जिल्ह्यात ५५० च्या आसपास रेशन दुकानदार आहेत. यामध्ये सर्वाधिक रेशन दुकाने मुरबाड तालुक्यात १९५ च्या जवळपास, शहापूर१७५-८०, भिवंडी १६०, कल्याण ४२ तर अंबरनाथ ३० दुकानदार आहेत. यातील काही दुकानातून या दिवाळी किट चे वाटप सुरू आहे तर अजूनही काही ठिकाणी ते सुरू झाले नाही. काही आदिवासी वाड्या वस्तीत अजूनही हे किट न पोहचल्याने या गरीबांची दिवाळी गोड झाली नाही. याला कोण जबाबदार?

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.