Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस भरतीपूर्व महिला प्रशिक्षणाथ्र्यांना दिला निरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 22 ऑक्टोबर :-  जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने आयोजित भरतीपूर्व प्रशिक्षणाचा आज समारोप एकलव्य धान पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

हे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण 21 सप्टेंबर से 22 ऑक्टोबर पर्यंत होते. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या पाचव्या बॅचमध्ये एकुण 100 महिला उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. या सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरित करण्यात आले. आता पर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 3554 युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र भंडारवार, सहा. प्रकल्प अधिकारी सुधाकर गौरकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे, पोमके चे सर्व प्रभारी अधिकारी, कमांडो ट्रेनिंग सेंटर किटाळीचे सर्व प्रशिक्षक तसेच नागरीकृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकिट आता 10 रू. वरून थेट 50 रू.

Jacqueline Fernandez :- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

 

Comments are closed.