Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारू विक्रेत्यांवर कारवाई करा

मुक्तीपथ दारू व तंबाखू मुक्त गडचिरोली जिल्हा तालुका समितीची बैठक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 8 जुन- आरमोरी तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत मुक्तीपथ तालुका समितीची बैठक तालुका समिती अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीहरी डी.माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आरमोरी तालुक्यातील एकूण 22 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य दारू विक्री सुरू आहे. त्या दारू विक्रेत्यांवर पोलीस विभागाद्वारे कारवाई करण्यात यावी, यासह विविध  ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले.

शहरात, वार्डात, ग्रामीण भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यावर पोलीस विभागाने कार्यवाही करून दारू विक्री बंद करावी, संवर्ग विकास अधिकारी यांनी पंचायत समिती द्वारा ग्रामपंचायत पातळीला कृती व्हावी असा तीन महिन्याचा कृती आराखडा तयार करावा व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठवावा, मुक्तीपथ ग्रामपंचायत समिती सक्रिय करण्यात यावी व त्या समितीचा पाठपुरावा करावा, शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळा दारू व तंबाखूमुक्त करण्याकरिता प्रत्येक शाळेला 11 निकषांचे पालन करून शाळा दारू व तंबाखू मुक्त करण्यासाठी शाळा स्तरांवर कृती आराखडा तयार करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नगरपरिषद, पोलीस, NCD, आरोग्य विभाग महसूल विभाग ,मुक्तिपथ, बालविकास प्रकल्प कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग, किशोर स्वास्थ विभाग, मावीम, तालुका अभियान उमेद, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, सामाजिक कार्यकर्ते, दैनिक पत्रकार, NSS प्रमुख, शहर संघटन सदस्य इत्यादी तालुका समितीतील सदस्यांचा एक पथक नेमून दर महिन्याला दारू व तंबाखू विरोधी धडक मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, मुक्तीपथ तालुका क्लिनिक दर सोमवारी सुरू राहत असून उपचारासाठी रुग्णांना पाठवावे असे सदस्यांनी सुचविले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शहरात, वार्डात, ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करून दारू व तंबाखू व्यसनींचं समुपदेशन करण्यात यावे, 3 वर्षापासून अवैद्य दारू विक्री बंद असलेल्या गावात विजयस्तंभ उभारणी फंड ग्रामपंचायत मधून देण्यात यावा असे सदस्याने सुचवलं व सर्वांनी संमती दर्शवली. शाळेच्या स्तरावर तंबाखूमुक्त शाळा समिती तयार केलेली असून ती सक्रिय करण्यात यावी असे एका सदस्यांनी सुचविले व सर्वांनी दुजोरा दिला. आदी ठराव पारित केल्यानुसार अंमलबजावणी करावी असे निर्देश सर्व संबंधित विभागांना अध्यक्षांनी दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले, मुख्याधिकारी नगरपरिषद आरमोरी तथा नायब तहसीलदार एच.एन. दोनाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप वासनिक , तालुका समिती सचिव तथा  तालुका संघटक विनोद एल.कोहपरे, ता.आ.से ए.आर. पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी  प्रभाकर एस. बारसिंगे , लक्ष्मी हरीश मने, व्यवस्थापक माविम अल्का एम. मेश्राम,  उपजीविका सल्लागार मविम साहिल पी. जुआरे, वनपाल एस. यु. फुलझेले, पत्रकार प्रा. दौलत धोटे, समुपदेशक असंसर्गजन्य रोग नियंत्रण विभाग किरण दहिकर, निखिल जे. गजभिये- उमेद आरमोरी, नारायण धकाते-सामाजिक कार्यकर्ते, पी .एस. चौधरी बाल विकास अधिकारी, दिक्षा ए. तेल्कापल्लीवार स्पार्क कार्यकर्ती आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन  विनोद एल्. कोहपरे तालुका समिती सचिव तथा मुक्तीपथ तालुका संघटक  यांनी केले तर आभार दीक्षा ए. तेल्कापल्लीवार स्पार्क कार्यकर्ती मुक्तीपथ यांनी मानले.

 

Comments are closed.