Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२२ ते २३ जून ला सर्च’ रुग्णालयात मोफत ई.एन.टी. शस्त्रक्रिया शिबिर

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 08 जुन – सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात  दि २२ ते २३ जून २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे. वारंवार कान फुटणे, कांनातून पस/पू निघणे, नाकाचे हाड वाकडे होणे, गलगंडाचा त्रास होणे, घश्यातील टॉन्सिल वाढणे, नाकातील मास वाढणे, नाकाचे हाड वाढणे, थॉयरोइडची गाठ वाढणे, तीव्र घसा खवखवणे ही लक्षणे असल्यास  शस्त्रक्रिया करण्यात येतील.

या शस्त्रक्रियेसाठी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. शैलेश कोठाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जरी कॅम्प घेण्यात येत आहे. डॉ. शैलेश कोठाडकर हे नागपुर येथील प्रसिद्ध ईएनटी सर्जन आहेत. मागील १२ वर्षापासून ईएनटी सर्जन म्हणून काम करीत आहेत आणि या क्षेत्रात त्यांनी प्रगल्भ कौशल्य आणि ज्ञान मिळविले आहे. शस्त्रक्रियेची सुविधा ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने मोफत  सर्जरी  कॅम्पचे आयोजन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन खर्च पुर्णपणे मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी दिनांक-२२ व २३ जून २०२४ रोजी होणार्‍या ई.एन.टी. सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून घ्यावी व सर्जरी करिता आपले नाव नोंदवून घ्यावे. प्रथम येणार्‍या रुग्णास प्राधान्य दिल्या जाईल. सर्जरी करिता नाव नोंदणी सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.