Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुणे शहरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 03 जुन-  राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधारा  कोसळत आहेत. हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.

पुणे शहरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रायगड, सांगली, बेळगाव, गोंदिया जिल्ह्यासंह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येते. पुणे शहरातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याचा पुणे वेधशाळेने वर्तवली होती. अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची तारांबळ उडालीये. शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे या सर्व भागात जोरदार पाऊस होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरीक करत होते, काल मृग नक्षत्राच्या प्रारंभातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकडापासून निश्चितच दिलासा मिळाला होता. मात्र, आज दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा बसला, त्यानंतर संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह आलेल्या पावसामुळे वातावरण थंड झाला असून  मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.