Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार शपथ; ‘या’ खासदारांचा NDA सरकारमध्ये समावेश?

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था दि,९ : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने या निवडणुकीत २४० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या २७२ जागांसाठी भाजपला एनडीएच्या घटकपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला आहे. जनता दल युनायटेड (जेडीयू), तेलुगु देसम पार्टीसह एनडीएतील इतर घटक पक्षांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी साथ दिलीय. त्यामुळे आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ७.३० वाजता एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजप सरकारमध्ये कोणत्या खासदारांचा समावेश होऊ शकतो,
जाणून घेऊयात..

सविस्तर माहिती.

अमित शहा :अमित शहा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. १९७८ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. अमिहत शहा हे नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. अमित शहांनी नरेंद्र मोदींच्या गुजरात सरकारमध्येही अनेक मंत्रीपदे भुषवली. अमित शाह मागील मोदी सरकारमध्ये गृहमंत्री होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गिरीराज सिंह: गिरीराज सिंह १९९० मध्ये राज्य बीजेवायएम संघाचे सरचिटणीस बनले. ते सर्वप्रथम २००२ मध्ये बिहार विधान परिषदेचे सदस्य झाले. २०१४ पर्यंत ते सलग दोनवेळा विधानपरिषदेवर राहिले. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात गिरीराज सिंह सहकार मंत्री होते. त्यानंतर पशु आणि मत्स्यसंपदा मंत्री होते. गिरीराज सिंह भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर बेगुसरायचे भाजपचे खासदार आहेत. मागील कार्यकाळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.

ज्योतिरादित्य सिंधिया : ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म १ जानेवारी १९७१ रोजी झाला. त्यांनी लोकसभेत मध्य प्रदेशातील गुना संसदीय जागेचे प्रतिनिधित्व केले. ज्योतिरादित्य सिंधिया हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मागील सरकारमध्ये ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री होते. १० मार्च २०२० रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

शिवराज सिंह चौहान: शिवराज सिंह चौहान यांचा जन्म ५ मार्च १९५९ रोजी झाला. १९७७-७८ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते संघटन मंत्री होते. शिवराज सिंह चौहान १९९० मध्ये बुधनी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. मध्य प्रदेश विधान सभा निवडणूका जिंकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री देण्यात आले नाही.

जितेंद्र सिंह : जितेंद्र सिंह यांचा जन्म ०६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. जम्मू आणि काश्मीरचे ते मुख्य प्रवक्ते होते. त्यांनी प्राध्यापक, सल्लागार वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. २०१२ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत जम्मूच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले.

राव इंद्रजित सिंह : हरियाणातील गुडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांचा पराभव केला. राव इंद्रजित सिंह हे १९९० ते २००३ पर्यंत भारतीय नेमबाजी संघाचे सदस्य होते. राव इंद्रजित सिंह यांनी राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
मनोहर लाल खट्टर : मनोहर लाल खट्टर यांचा जन्म ५ मे १९५४ रोजी झाला. खट्टर यांचे कुटुंब १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून रोहतक जिल्ह्यातील स्थायिक झाले. ते भारताच्या हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. १८ वर्षानंतर हरियाणाचे पहिले बिगर जाट मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले.

मनसुख लक्ष्मणभाई मांडविया : मनसुख लक्ष्मणभाई मांडविया यांचा जन्म १ जून १९७२ रोजी झाला. मागील मोदी सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेट रसायने आणि खते मंत्री म्हणून कार्यरत होते. मांडविया यांचा जन्म गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पालिताना तालुक्यातील हनोल नावाच्या गावात झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.