Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेपत्ता ग्रामपंचायत शिपायाचा मृतदेह आढळला झाडाला लटकलेल्या स्थितीत

परिसरात उडाली खळबळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील कुरंडीमाल ग्रामपंचायतीचा या प्रकरणात शिपाई अमृत सराटे यांचा मृतदेह ३ डिसेंबरला गावालगतच्या जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत  आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कुरंडीमाल ग्रामपंचायतीचा शिपाई अमृत सुखदेव  सराटे, वय ३०, रा. कुरंडीमाल  हा १६ नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होता.बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १९ व्या दिवशी  त्याचा मृतदेह ३ डिसेंबरला गावालगतच्या जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अमृत सराटे हा १६ नोव्हेंबरला सकाळी शौचास जातो म्हणून घराच्या  बाहेर पडला होता, परंतु बराच वेळ होऊनसुद्धा तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा शोधा घेण्यास सुरुवात केली, पण त्याचा कुठेही  शोध लागला नाही. अखेर कुटुंबातील व्यक्तींनी आरमोरी पोलिस ठाणे गाठून बेपत्ता झाल्याची  तक्रार नोंदविली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दि. 0३ डिसेंबर रोजी गावातील एक व्यक्ती सरपण आणण्यासाठी जंगलात गेला असता त्यास एक  मृतदेह कोजबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली होती. सदर घटनेची सूचना गावात  तसेच पोलिसांना दिली असता आरमोरी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून जागेवरच उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली असून  व्हिसेरा राखून ठेवला असून अधिक तपास सुरू असल्याचे पो.नि. कैलास गवते यांनी सांगितले.

 

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.