Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई – पुणे मार्गावर मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनला पहिल्यांदाच जोडण्यात आलेल्या विस्टाडोम कोचचे बुकींग फुल्ल

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • एलएचबी रॅक व व्हिस्टाडोम कोचसह मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनची पहिली फेरी दि. २६.६.२०२१ पासून सुरू झाली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २६ जून : एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी दि. २६ जून रोजी सुरू झाली. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व ४४ सीटस बुक होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली. या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला.

रेल्वेमंत्री, भारत सरकार, पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, “मुंबई-पुणे मार्गावर, विषेश डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढत आहे. यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आपले सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे. “उमेश मिश्रा जे आपल्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करीत होते. त्यांनी फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या व्हिस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठ्या खिडक्या आणि बदलानुकारी/हलु शकणा-या आसनांमुळे त्यांच्या मुलास या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेता आला. दुसर्‍या प्रवाशाने सांगितले की, तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा नियमित प्रवासी असून व्हिस्टाडोम कोच जोडल्याने भोर घाटातील प्रवास अधिक आनंददायक होईल. प्रथमच व्हिस्टाडोममध्ये प्रवास करणार्‍या सायली म्हणाल्या की त्यांनी मोठ्या खिडकीच्या पॅनेलमधून या दृश्यांचा आनंद लुटला आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल त्यांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले.

ठरलेल्या वेळेत ही रेल्वेगाडी पुण्यात पोहोचली.

प्रवासी माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतील.

हे देखील वाचा :

केंद्र व राज्यसरकार शेतकरी विरोधी त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा  : संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन

अहेरी पोलिसांच्या धडक कारवाईत महागाव येथे चारचाकी वाहनासह ५ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त, तिघा जणांना केली अटक 

ओबीसींना न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.