Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहीपिंपळगाव येथे दलित समाजावर बहिष्कार

  • ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर गावातील लोकांनी घातला बहिष्कार .
  • आरोपींना अद्याप अटक न केल्याने दलित समाजातून रोष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड, दि. २ मे: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष केल्याच्या कारणावरून मराठा समाजातील तरुणांनी जातीय द्वेषातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केलेला आहे.  त्यानंतर आरोपींवर झालेल्या ऍट्रोसिटी गुन्ह्यानंतर गावाने दलित समाजावर बहिष्कार घातल्याची घटना घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावातील मेडिकलची औषधी, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी दलित समाजासाठी बंद करण्यात आली. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या दलित तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला आहे. त्यासोबतच निधन पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडेही घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.