Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील वेलगुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नवेगाव गावात पती व पत्नीचा मृतदेह राहत्या घरात आज शुक्रवारी आढळून आला आहे.

मृतकाचे नाव जनार्दन लचमा कोटरंगे (५०) व महिलेचे नाव पोचूबाई जनार्दन कोटरंगे (४८) असे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पती पत्नी मजुरीचे काम करीत होते. जनार्धन याने पाच दिवसांपूर्वी एका गावकऱ्याकडून कामांसाठी सायकल मागितली होती. मात्र ती परत न केल्यामुळे आपली सायकल मागण्यासाठी तो इसम गेला असताना त्याला आज सकाळी धक्कादायक दृश्य दिसून आले. दोन्ही पती व पत्नीचा मृतदेह राहत्या घरी दिसून आला.

पती चा मृतदेह फाट्याला लटकून होता तर पत्नी चा मृतदेह खाटेवर पडुन असलेल्या अवस्थेत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. लागलीच मृतकाच्या मुलाला सदर घटनेची माहिती दिली. मृतकाचा मुलगा त्याच्या सासरला कामानिमित्त गेला होता. घटनेची माहिती होताच तो गावी दाखल होऊन अहेरी पोलीस स्टेशन ला सदर घटनेची माहिती दिली.

अहेरी पोलीस घटनास्थळी पोहोचून सदर घटनेचा पंचनामा करत आहे. पोलीस तपासानंतरच घटनेची अधिक माहिती मिळणार आहे अशी माहिती अहेरीचे पो.नी डांगे यांनी दिली आहे.

 

हे देखील वाचा :

‘त्या’ दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली अटक

चोरी गेलेल्या ९० मोबाईलचा शोध लावण्यात गडचिरोली सायबर पोलिसांनी मिळविले यश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.