भारतीय जनसंसदेचे संघटन वाढवून नियमबाह्य कामकाजा विरोधात लढण्याची ताकद निर्माण करा
भारतीय जनसंसद संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे प्रतिपादन .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली ०६ डिसेंबर : अहेरी येथे भारतीय जनसंसदेची तालुका शाखेच्या वतीने आज दिनांक ०६ डिसेंबर ला कार्यकर्ता चर्चासञ बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. स्वतंञ भारत देशाची जनता मालक असुन शासकीय कर्मचारी अधिकारी हे जनतेचे नौकर आहे लोकशाही राज्या मध्ये जनतेनी आपले अमुल्य मते देऊन निवडून दिलेली खासदार,आमदार आणि ग्राम पंचायत,पंचायत समिती,जिल्हा परीषद,यातील सदस्य , लोकप्रतीनिधी हे जनतेचे विश्वस्त आहेत.परंतू अनेकदा असे दिसुन येते की, जनतेच्या साध्याभोळ्या पणाचा फायदा घेऊन लोकप्रतिनिधी व कर्मचारी अधिकारी यांची साखळी तयार झालेली आहे. ज्या मुळे अनेकदा सर्वसामान्य जनतेला अन्यायाचा सामना करावा लागतो .
सद्याच्या परस्थितीत वनविभाग,महसुल विभाग, जिल्हा परीषद ,व अनेक विभागाचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी उपस्थीत राहत नसुन जनतेच्या कामकाजात अडचन निर्मान झालेली आहे . जनतेच्या सोई करीता शासन,प्रशासन लाखो,करोडो रुपयाचे विकासात्मक बांधकामासह विविध योजना राबवितात परंतू अनेक योजना कागदोपञी राहुन जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे कामे होत असुन या कडे जनतेचे विश्वस्त असलेल्या अति विश्वासू लोकप्रधींचे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळेस प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रहिताची भावना जोपासुन जर का शासन व प्रशासनाच्या कामकाजात नियमबाह्यता व आढळून येत असेल किंवा एखाद्या ठिकाणी राष्ट्रीय संपतीस धोका निर्मान होत असेल तर त्याची माहिती वेळीच संबधीत विभागास देणे आपल्या सर्वाची नैतीक जबाबदारी आहे.
कुठल्याही प्रकरणात हेतुपुस्पर शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर नियमबाह्य कारभार हाणुन पाडण्या करीता व पारदर्शक कामकाजाकरीता संघटनेच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावी लागणार आहेत. तेव्हा तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवर सक्रीय कार्यकर्त्याचे संघटन वाढविणने अत्यंत गरजेचे असुन प्रत्येकानी सामाजीक बांधीलकी जोपासून संघटन वाढविण्याकडे पदाधिका-य़ाने लक्ष देण्याची गरज असुन जनहितार्थ शासन,प्रशासन दरबारी राबविण्यात येणा-या एकुन योजनाची प्रबळ अमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने त्यावर नियञंण म्हणुन प्रत्येक ग्राम पातळीवर भारतीय जन संसदेची शाखा स्थापन करण्याची नितांत गरज भासत आहे.
भारतीय जनसंसदेचे संघटन वाढवून निय्यमबाह्य कामकाजा विरोधात लढण्याची ताकद निर्माण करा . असे आवाहन अहेरी येथील चर्चासञ बैठकीत करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाला महीला जिल्हाध्यक्ष डाँ.निलीमा सिंह . अहेरी तालुका अध्यक्ष सुरेश दुर्गे ,तालुका सल्लागार सिध्दार्थ देठे, छञपत्ती गोवर्धन, नरेन्द सडमेक ,देवीदास गावडे, प्रकाश बोरकुटेसह आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
Comments are closed.