Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंचवार्षिक बृहत आराखडा (२०२५-२९) तयार करण्यासाठी सर्वेक्षण प्रश्नावलीद्वारा अभिप्राय देण्याबाबत आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 12 एप्रिल :- गोंडवाना विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत आराखडा (२०२५-२९) तयार करत असून त्याकरीता विविध भागधारक / घटकांकडून सर्वेक्षण प्रश्नावली द्वारे अभिप्राय द्यावयाचे आहेत.

याअनुषंगाने सर्व भागधारक / घटक जसे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापरिषद सदस्य, सर्व संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शासकिय अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, संलग्नित महाविद्यालयाचे संस्थाचालक इत्यादींना विद्यापीठ संकेतस्थळ https://unigug.ac.in/ वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन लिंक मार्फत सर्वेक्षण प्रश्नावली द्वारे अभिप्राय भरून देण्याकरीता विद्यापीठ प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.