Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमृत सरोवर तलावाच्या कामावर योग दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यात अमृत सरोवर तलावांवर योग दिवस साजरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 21 जून – 21 जुन हा दिवस संपुर्ण विश्वभरात योग दिवस म्हणुन साजरा केला जातो. निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी योग अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती प्राप्त होते. सन 2015 पासुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. याच धर्तीवर संयुक्त राष्ट्र महासभेत भारत देशाने अभिनव पुढाकार घेतला असल्याने, भारत देशाला योगाचा संदेश आणि फायदे जगभरात पोहचवण्यास मदत झालेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमृत सरोवराचे परिसर शांत व पवित्र वातावरण योग उत्साहिंना एकत्र येण्यासाठी व योगाच्या सर्वांगिण अभ्यासामध्ये मग्न होण्यासाठी एक आदर्श ठिकाण उपलब्ध करुन देते त्या निमीत्याने जिल्हात अमृत सरोवर तलावाच्या कामावर योग दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यातील प्रत्येक अमृत सरोवर तलावांवर योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे.

योग दिनाच्या यशस्वीतेसाठी संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली. कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली. धनाजी पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो), गडचिरोली. श्री. हिवंज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) जि.प. गडचिरोली. श्री. जयस्वाल, जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा.) जि.प. गडचिरोली संबधित यंत्रणेचे सर्व अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तरुण युवा मंडळी, गावकरी तसेच रोहयो कंत्राटी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेऊन योग दिवस उत्साहाने पार पाडण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :- 

Comments are closed.