Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर द्वारा ४५ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा

नव्या युगाच्या स्थापनेत जनसंपर्काची भूमिका महत्त्वाची : डॉ. बबन जोगदंड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, 22 एप्रिल 2022 : विश्वास आणि आत्मविश्‍वासाने नवे युग प्रस्थापित करण्यात जनसंपर्काची भूमिका महत्त्वाची असते. संस्‍था, समाज आणि राष्ट्राला जोडुन ठेवणे हे जनसंपर्काचे मर्म आहे, असे विचार सुप्रसिद्ध जनसंपर्क तज्ज्ञ, ‘यशदा’ पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी व्यक्त केले. पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय), वर्धा चॅप्टर तर्फे ४५ व्या राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त गुरूवार, 21 एप्रिल रोजी आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीआरएसआयचे वर्धा चॅप्टरचे अध्‍यक्ष प्रो. अनिल कुमार राय होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद वर्धा चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश भगत उपस्थित होते.

कार्यक्रमात मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संबंधित पत्रकार, विविध आस्थापनांमध्ये कार्यरत जनसंपर्क कर्मचारी, जनसंवाद व पत्रकारितेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच वर्धा चॅप्टर चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. जोगदंड यांनी संवाद कौशल्य, आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि प्रभावी जनसंपर्कासाठी व्यक्तीला जोडण्याची कला या पाच सूत्रांवर चर्चा करताना सांगितले की बदलत्या वातावरणात जनसंपर्क हे एकमेव माध्यम नवीन युगाच्या स्थापनेत प्रभावी भूमिका बजावू शकते. अध्यक्षीय भाषणात प्रो. अनिल कुमार राय म्हणाले की विश्‍वास हा जनसंपर्काचा मजबूत धागा आहे. ती एक निरंतर प्रक्रिया आहे. कॉर्पोरेट जनसंपर्क, जनसंपर्क व्‍यवस्‍थापन यावर ही त्यांनी विचार मांडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे प्रास्‍तविक पीआरएसआयचे कोषाध्‍यक्ष प्रफुल्ल दाते यांनी केले. पीआरएसआयने यापूर्वी आयोजित केलेल्या प्रवेश व रोजगार संमेलन, छायाचित्र स्पर्धा, पर्यावरण जनजागृती परिषद आदींची माहिती त्यांनी दिली. डॉ अनवर अहमद सिद्दीकी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे संचालन पीआरएसआयचे सचिव बी.एस. मिरगे यांनी केले तर आभार पीआरएसआयचे सदस्य डॉ. राजेश लेहकपुरे यांनी मानले.

कार्यक्रमात डॉ. अख्तर आलम, डॉ. रेणू सिंग, डॉ. संदीप वर्मा, सचिन रायलवार, अनुपम राय, डॉ. भास्कर भोसले, डॉ. विद्या कळसाईत, आनंद भारती, विनेश काकडे, संदीप घनोकर, नंदकिशोर वानखेडे, डॉ. रुपाली अलोने, डॉ. चेतन भट्ट, कल्याणी मसादे, शृतिकीर्ती पटेल, सुधीर कुमार, अमिता शिंदे, अदिती भंडारी, गायत्री उपाध्याय, लाल सिंग, मनोहर लाल, नेहा जीवतोडे, रजत बत्रा, रेणू सोनकर, शालू कुमारी, प्रिया कुमारी, परमीना, किशोर मानकर, पल्लवी सावरकर, अहमद अजीम, आकांक्षा भोयर, सुरजित कुमार इत्‍यादी सहभागी झाले होते.

 

 

 

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.