Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि. प. कन्या शाळा, आलापल्ली येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. 21 एप्रिल : आज दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी, जि. प. कन्या शाळा, आलापल्ली येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन शंकर मेश्राम (सरपंच आलापल्ली) व लोनबले सर (मुख्याध्यापक राणी दुर्गावती) यांनी केले.

कार्यक्रमात दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी ७ स्टॉल्स चे आयोजन करण्यात आले होते व त्यांना विकास पत्रक देण्यात आले.
जि. प. कन्या शाळा, आलापल्ली येथे ऐकून २० विदयार्थी दाखल पात्र आहेत त्या पैकी ९ विदयार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत मेळाव्यास उपस्थिती दर्शवली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मेळाव्यास आकनपल्लीवार (उपसरपंच आलापल्ली), ग्रामपंचायत सदस्य, जगदीश बोम्मावार (केंद्र प्रमुख), कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन चे राज वळवी (प्रोग्राम लीडर) व कु. सरस्वती धायगुडे (फेलो), गट साधन केंद्र अहेरी चे विस्तार अधिकारी मुनमाडे सर, गट साधन केंद्र अहेरी चे साधन व्यक्ती व फुलोरा समन्वयक, 12 अंगणवाडी सेविका, धर्माराव हायस्कूल चे ७ शिक्षक व शिक्षिका, ४० विद्यार्थी आणि राणी दुर्गावती हायस्कूल चे 3 शिक्षक आणि 35 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते, जि. प. मुलांची शाळा, आलापल्ली येथील मुख्याध्यापक अजय सोनलवर सर तसेच जि. प. कन्या शाळा, आलापल्ली चे ४ शिक्षक व शिक्षिका आणि ४२ विद्यार्थीनी उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष आणि पालक सुद्धा उपस्थीत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी दुर्गावती हायस्कूल चे शिक्षक गणेश पहापाळे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धर्माराव हायस्कूल च्या शिक्षिका गोहोकर मॅडम यांनी केले.

सदर मेळाव्याचे आयोजन जि. प. कन्या शाळा, आलापल्ली चे मुख्याध्यापक मुकुंद सडमेक, शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका तसेच कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनच्या फेलो सरस्वती मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत आलापल्ली यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमात राणी दुर्गावती व धर्माराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली.

हे देखील वाचा : 

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश

 

Comments are closed.