Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश

एकुण १८ लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलीस अटक, अटकेत दोन एसीएम न दोन सदस्यांचा समावेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २१ एप्रिल : नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत
येणाऱ्या पोमके धोडराज हद्दीत दि. २१/०४/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना चार जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.

नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत अशी गोपनिय माहिती पोलीस दलास मिळाल्याने पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियाना दरम्यान ०४ जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे वय ३० वर्ष रा. नेलगुंडा ता. भामरागड ,मारोती
ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे वय-३४ वर्ष रा. कनेली ता. धानोरा , सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी वय- २४ वर्ष पडतमपल्ली ता. भामरागड , अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जानून घेऊया कोणत्या नक्षल कंपनीत होते.

जहाल नक्षली बापु बडे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी पोमके कोठीअंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रीय सहभाग होता. तसेच त्यांचा ७ खुन, ३ चकमक, १ जाळपोळ, २ दरोडा, अशा एकुण १३ गुन्हयामध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. एकुण ०३ चकमकीच्या गुन्हयामध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचा ०३ खुन व ०८ चकमक अशा एकुण ११ गुन्हयामध्ये समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिनांक १३/०४/२०२२ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा.) हद्दीमध्ये नामे अशोक ऊर्फ नविन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे व अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली यांचा सक्रीय सहभाग होता.

नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने १) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर ८ लक्ष रुपये. २) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे याचेवर ६ लक्ष रूपये. ३) सुमन ऊफ जन्नी कोमटी कुड्यामी हीचेवर २ लक्ष रुपये व अजित ऊर्फ भरत याचेवर २ लक्ष रुपये असे एकुण १८ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख ., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वात पार पडली.

हे देखील वाचा : 

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणाबाबत

महिला व बाल रूग्णालय, गडचिरोली – माता व बालकांसाठी नवसंजीवनी

 

 

 

Comments are closed.