Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्राम पंचायत आलापल्ली येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २६ जानेवारी: आज २६ जानेवारी २०२१ रोजी ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्य ग्राम पंचायत आलापल्ली येथील ध्वजारोहन महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, आलापल्ली चे अध्यक्ष सुरेश गड्डमवार यांच्या हस्ते करण्यात आले.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘प्रजासत्ताक दिन’ देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून प्रजेची सत्ता स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं. म्हणून याच दिवशी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावेळी ग्राम पंचायत आलापल्ली येथे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व त्यानंतर सुरेश गड्डमवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित ग्राम पंचायतचे माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्यगण, ग्राम पंचायत आलापल्ली कार्यालयाचे सर्व कर्मचारी, माजी जि.प. सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यगन, आलापल्ली परिक्षेत्राचे चे अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, अशा स्वयंसेविका, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्यगन, पेसा अध्यक्ष व सर्व सदस्यगण तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुकुंद सडमेक (मुख्याध्यापक) यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.