Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेड्डीगड्डा प्रकल्पमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिरोंचा, 27 एप्रिल : मेडीगड्डा प्रकल्प सुरू होऊन पाणी नेण्याचा प्रक्रियेत आज पर्यंत प्रकल्प वरचा २०० हेक्टार आणि प्रकल्प खालचा भागात ३०० हेक्टार जाणाऱ्या शेतजामिन आहे. याचा आता पर्यंत शासनाकडून कोणतेही प्रकरचा नोटीफिकेशन दिलेली नाही फक्त जेव्हा पिडीत शेतकरी सखाळी उपोषणात बसले होते संबंधित जलसिंचन कार्यकारी अभियंते कडून मोजमाप करण्यात आलेली शेतजामिन आहे, ऐवढी शेतजामिन भुसंपादनासाठी आहे. हे आपले ताजे आकड़े आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१२८ हेक्टार शेतजामिन गेल्या तीन वर्षापुर्वी मंजुर झालेली असून त्याचा भुसंपादन प्रक्रिया स्थागित ठेवण्यात आली होती त्या संबंधि तेलंगाना सरकार ११ कोटी निधी अगोदर महाराष्ट्र शासना कडे दिली होती.पिडीत शेतकऱ्यांचा उपोषण अंदोलन धरने याचा परिणाम हिवाळी अधिवेशन संदर्भात विधानसभा क्षेत्रातील आमदाराच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेबाशी मुलाकात करून पिडीत शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्या पुर्ण करण्याचा आश्वासन देत अधिवेशन सभागृहात गेल्या तीन वर्षा अगोदर मंजुर झालेली १२८ हेक्टार शेतजामिन भुसंपादनासाठी स्थागित ठेवून असलेल्या शेतजामिनाच्या तीन वर्षा अगोदर जी मोबदला दिली गेली होती त्याचा ५℅  अतिरिक्त दर मिळवून पिडीत शेतकऱ्यांना मोबदला महाराष्ट्र सरकार दिली जाणार अशी आश्वासन मा. देवेंद्र फडणवीस साहेब यानी दिले होते त्यानुसार लागणारी पुन्हा २६ कोटी हा निधीचा मागणी महाराष्ट्र सरकार तेलंगाना सरकार कडे प्रस्तावित केले असता तेलंगाना सरकारा कडे आता साध्य स्थितीत वित्त विभागाकडे कोणत्याही निधी उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिले.

आता पर्यंत गेल्या तीन वर्षा अगोदर मंजूर झालेले १२८ हेक्टार शेतजामिनीचाच आता पर्यंत निवारण करण्यास असफल होत असल्यास बाकी आज अधिकम २०० हेक्टार शेतजामिनीचा तसेत कपात होऊन गोदावरी नदीत रूपांतरण झालेल्या ३०० हेक्टार शेतजामिनीचा भुसंपादन केव्हा करणार, महाराष्ट्र राज्य सरकार केव्हा लक्ष्य केंद्रीकृत करणार याची फार मोठी प्रश्न पिडीत शेतकऱ्यांना समोर राहत आहे त्यासाठी पिडीत शेतकऱ्यांकडे एकच मार्ग न्याय मिळे पर्यंत लढा हाच एक अस्र आणि हाच एक मोहिम म्हणून आज सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषणत बसले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.