Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत व्यसनमुक्तीवर विद्यार्थ्यांची जनजागृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 27 एप्रिल : अहेरी शंकरराव बेझलवार काल महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘सर्च फाउंडेशन’ च्या वतीने व्यसनमुक्ती वर विद्यार्थ्यांची जनजागृती करण्याचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.नागसेन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात सर्च फाउंडेशन चातगाव, गडचिरोली च्या वतीने आनंदराव कुंभारे यांनी आपल्या मनोगतातून व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला कसे आजार जडतात, व्यसनाचे काय काय दुष्परिणाम आहेत, व्यसनधीन व्यक्ती हा त्याचे सुंदर आयुष्य कसे उध्वस्त करतो हे सांगून व्हिडिओ क्लिप्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. हजारे, प्रा. जंगमवार, प्रा. उत्तरवार, प्रा.आवारी, प्रा. घोडेस्वार, प्रा. बनसोड, प्रा. पूजा मॅडम, प्रा.घोणमोडे आणि शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन एनएसएस विभाग प्रमुख प्रा घोडेस्वार यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्या्थिनी बहुसंख्य उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.