Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि ४ डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा
सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण. 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव
दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण. 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव. दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्रिकेटचा खेळ मांडला कार्यालयीन वेळेत कार्यालया समोर. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित असलेल्या अल्लापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार.

Comments are closed.