Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

जळगाव:- जळगावमध्ये, दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या, अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त, अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरात राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच या परिसराचं चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, त्यामध्ये वीज आणि पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनानं प्राधान्य दिलं आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढील १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर फिडरचं काम वेगानं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड आदि उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.