Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी खासदार मोहन रावले यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, १९ डिसेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार मोहन रावले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, शिवसेनेच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ मुंबईकरांचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार मोहन रावले यांच्या निधनाने धक्का बसला. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांत आघाडीवर असलेल्या मोहन रावले यांनी त्यांचा स्वभाव आणि कार्यशैली यामुळे सर्वसामान्यांना आपलेसे केले होते.
संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
माजी खासदार मोहन रावले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.