Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राशी संध्याकाळी 7 वाजता साधणार संवाद, लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २१ फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 7 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जो स्फोट झालाय त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादाला महत्व आहे. महाराष्ट्रात पुन्हा नव्यानं लॉकडाऊन लागणार का अशी जनतेत चर्चा आहे. त्यावर संभ्रमही मोठ्या प्रमाणात दिसतो आहे, त्यावर काही ठोस बोलतील अशी अपेक्षाही आहे.

फक्त मुंबईच नाही तर पुण्यासारख्या ठिकाणीही पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांच्या ठिकाणी तर कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतही कोरोना वेगानं पसरतोय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा सुरु झाला आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने मिळू लागलेले आहेत. राज्यातील मंत्र्यांनी संचारबंदीचे संकेत दिलेले असताना आज मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधून कोणत्या मुद्द्यांवर बोलणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत. कोरोना प्रकोपाच्या काळात मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

पाठीमागील एक वर्षांच्या कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांना धीर दिला. संचारबंदी, टाळेबंदीच्या काळात जनतेशी बोलून त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आताही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जनतेच्या मनात परत टाळेबंदी होतीय का?, असे प्रश्न असल्याने उद्धव ठाकरे आजच्या संवादातून उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.