Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मूल, चंद्रपूरला जाताय; हेल्मेट, परवाना आहे का?

जिल्हा सीमेवर मोहीम : वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत प्रशासनाच्या वतीने कठोर धोरण अवलंबत आदर्श आचारसंहितेचे पालन केले जात आहे. दरम्यान चंद्रपूर रोडवरील  वैनगंगा नदीच्या पुलाच्या पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच  हेल्मेट व वाहन परवाना नसलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे   दुचाकीस्वारा कडून  दीड ते दोन हजार रुपये दंड वसुली करत आहे.

गडचिरोलीवरून दुचाकीने मूल, चंद्रपूरला जाताना हेल्मेट आणि वाहन परवाना स्वत:जवळ बाळगणे आवश्यक आहे. ज्या वाहनचालकांकडे वाहन परवाना आणि  हेल्मेट नाही. तसेच ज्या  दुचाकी स्वाराकडे  पीयुसी व इतर कागदपत्रे नाही, अशांवर कारवाई केली जात आहे. विशेषत  ही कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांकडून केली जात आहे. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आवागमन करणारे गडचिरोलीतील धास्तावले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.